राज्यात दोन वर्षांनंतर Ready Reckoner दरात सरासरी 5 टक्के वाढ,सामान्यांचं घराचं स्वप्न महागणार
Continues below advertisement
राज्यात दोन वर्षांनंतर रेडीरेकनरच्या दरात सरासरी पाच टक्के वाढ करण्यात आलीय.. पालिका क्षेत्रात ८.८० टक्के, ग्रामीण भागात ६.९६ टक्के तर नगरपालिका क्षेत्रात ३.६२ टक्के वाढ करण्यात आलीय. कोरोनाच्या संकटामुळे गत वर्षी रेडीरेकनर दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. मुंबई, ठाणे, पुण्यापेक्षा नाशिकमध्ये रेडीरेकनरचे दरात सर्वाधिक वाढ झालीय. राज्यात सर्वाधिक १३.१२ टक्के वाढ मालेगाव पालिका क्षेत्रात झालीय तर सर्वात कमी वाढ हिंगोली जिल्ह्यात झालीय. मुंबई महापालिका क्षेत्रात रेडीरेकनरच्या २.३४ टक्के एवढी वाढ झालीय. रेडीरेकनरच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न महागणार आहे..
Continues below advertisement