Wardha Truck Fire | RBI स्क्रॅप नोटांच्या ट्रकला आग, संपूर्ण नोटा जळून खाक ABP Majha

Wardha Truck Fire | RBI स्क्रॅप नोटांच्या ट्रकला आग, संपूर्ण नोटा जळून खाक ABP Majha

आर बी आय च्या बाद झालेल्या नोटांचे स्क्रॅप वाहून नेणाऱ्या ट्रकला वर्ध्यात कांढळी येथे आग लागली.  नागपूर हैद्राबाद महामार्गावर कांढळी येथे बरबडी शिवारात ही घटना घडली आहे. हैद्राबाद येथून रिजेक्ट झालेल्या नोटांची रद्दी घेऊन हा ट्रक उत्तर प्रदेश येथील मुझ्झपर नगर येथे पेपर मिल मध्ये निघाला होता. पण कोंढाळी येथे या ट्रकने अचानक पेट घेतला. ट्रकमधील संपूर्ण नोटांचे स्क्रॅप जळून खाक झाले आहे. ट्रक जळाल्यावर येथे परिसरातील नागरिकांनी धाव घेतली, ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात कापलेल्या नोटा आढळून आल्याने नोटा भरून असलेला ट्रक असल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. लगेच पोलिसांनी येथे पोहचत माहिती घेतली आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला आहे. या नोटा स्क्रॅप असलेल्या नोटा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटणास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola