Raza Academy Amravati : रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू, Sanjay Raut यांचा गंभीर आरोप

Continues below advertisement

मुंबई : मालेगाव, नांदेड आणि अमरावती या महाराष्ट्राच्या तीन मोठ्या शहरात त्रिपुरातील कथित हिंसाचारवरून (Tripura Violance)  दंगल उसळली. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रझा अकादमी (Raza Academy) चर्चेत आली आहे. ही रझा अकादमी  तिचं आहे जिच्यावर पुन्हा पुन्हा हिंसा भडकवल्याचा आरोप केला जातो. यापूर्वी 11 ऑगस्ट 2012 मध्ये मुंबईत हिंसाचार झाला होता तेव्हाही रझा अकादमी आरोपीच्या पिंजऱ्यात होती. आता तर रझा अकादमी ही अतिरेकी संघटना आहे. त्यामुळे तिच्यावर तातडीने बंदी घालावी अशी मागणी भाजपने केली आहे. तर रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू आहे. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram