Sindhudurg : वाळू शिल्प साकारत नवीन वर्षाच्या शुभेच्छा, वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांची कला
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले मधील आरवली समुद्र किनाऱ्यावर वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी वाळू शिल्प साकारत अनोख्या पध्दतीने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वेंगुर्लेतील आरवली समुद्र किनाऱ्यावर रविराज चिपकर यांनी २ टन वाळूचा वापर करत नवीन वर्षाच्या सुरवातीला वाळूशिल्प साकारत सर्वांना नविन वर्षाचे शुभेच्छा दिल्या आहेत. रविराज चिपकर हे नेहमी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची अनेक वाळूशिल्प आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेली आहे.
Continues below advertisement