Mumbai Corona : मुंबईतील उच्चभ्रू वस्त्यांमधील वाढत्या कोरोनामुळे टेन्शन!

Continues below advertisement

फोर्ट, ग्रॅण्ट रोड, अंधेरी, वांद्रय़ात सर्वाधिक रुग्ण; उच्चभ्रू वस्त्यांमधील वाढत्या कोरोनामुळे टेन्शन

मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना ओमायक्रोनने चांगलेच हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात झालेल्या 282 चाचण्यांमध्ये तब्बल 55 टक्के रुग्ण झपाटय़ाने पसरणाऱ्या ओमायक्रोनचे असल्याचे समोर आले आहे.
 
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत तब्बल 90 टक्के रुग्ण उच्च्चभ्रू वस्ती-इमारतींमधील असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये ए विभाग कुलाबा-फोर्ट, डी विभाग ग्रॅण्ट रोड-गिरगाव परिसर, अंधेरी पूर्व-पश्चिम आणि वांद्र पूर्व-पश्चिममध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट पूर्ण आटोक्यात आल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून झपाटय़ाने रुग्णसंख्या वाढत आहे. 100 पर्यंतखाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या आता थेट तीन हजारांवर गेल्याने तिसऱ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. मात्र या रुग्णंख्येत झोपडपट्टीपेक्षा इमारतींमधील बाधितांची संख्या सर्वाधिक असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. परदेशातून आल्यानंतर विमानतळावर होणाऱ्या चाचण्यांमध्ये हे प्रवासी बाधित असल्याचे स्पष्ट होत नसले तरी काही दिवसांनी हेच प्रवासी बाधित होत आहेत. या काळात संबंधित प्रवाशांचा कुटुंबासह अनेकांशी संपर्क येत असल्यामुळे, मीटिंग-कार्यक्रमांना हजेरी लावली जात असल्यामुळेच उच्चभ्रू वस्त्यांमध्ये कोरोना वेगाने पैलावत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram