Ravindra Waikar ED Raid:ईडी स्वायत्त संस्था, त्यांच्यावर दबाव नाही,Shambhuraj Desaiयांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
Ravindra Waikar ED Raid:ईडी स्वायत्त संस्था, त्यांच्यावर दबाव नाही,Shambhuraj Desaiयांची प्रतिक्रिया

Ravindra Waikar ED Raids: मुंबई : ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या घरी सकाळपासून ईडीची रेड सुरू झाली. रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब आणि घरी अशा एकूण चार ठिकाणी ED कडून छापेमारी सुरू करण्यात आली आहे. जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीनं अनेकदा नोटीस धाडली होती. अशी माहिती तक्रारदार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती. 
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरू आहे. जोगेश्वरी कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी सकाळी सात वाजल्यापासून छापेमारी सुरू आहे. आमदार रवींद्र वायकर यांच्या मातोश्री क्लब या निवासस्थानासह अशा एकूण चार ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून रवींद्र वायकर आणि कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, काही कागदपत्र मिळतात का? याची चाचपणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. 
जुलै 2021 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भ्रष्ट पद्धतीनं जोगेश्वरीतील खेळाचं मैदान ताब्यात घेऊन त्यावर तब्बल 500 कोटी रुपयांचं पंचतारांकित हॉटेल बांधल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकरांवर केला होता. तसेच, यासंदर्भातील तक्रारही सोमय्यांनी केली होती. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram