Ravikant Tupkar : मोदींचा चेहरा बाजूला ठेवून निवडणूक लढा; रविकांत तुपकर यांचं प्रतापराव जाधव यांना चॅलेंज

Ravikant Tupkar : मोदींचा चेहरा बाजूला ठेवून निवडणूक लढा; रविकांत तुपकर यांचं प्रतापराव जाधव यांना चॅलेंज माझी लढत प्रतापरावांशी नसून प्रतापराव जाधव यांची लढत माझ्याशी आहे . परिस्थिती अशी आहे की सध्या प्रतापराव जाधव यांच्या गाडीमध्ये बसायला सुद्धा माणसं भेटत नाहीत.  माझा पक्ष जनता आहे... मला कुठेही तिकीट आणायला जावं लागलं नाही . माझी तयारी गेल्या पाच वर्षापासून  सुरू आहे. त्यामुळे या अफवा आहेत की मी भाजपा त जाईल आणि या अफवा यांनीच पेरलेल्या आहेत.   विद्यमान खासदाराच्या पायाखालची वाळू सरकली आहे. परवा त्यांनी माझी लायकी काढली आता त्यांची लायकी जनता काढणार आहे.   मला मिळत असलेल्या जनतेतून प्रतिसादामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि ते आमच्या कार्यकर्त्यांना आता धमक्या देत आहेत.   स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असं त्यांचं तत्त्व आहे.   हिम्मत असेल तर प्रतापराव जाधव यांनी पक्ष आणि मोदींचा चेहरा बाजूला ठेवावा आणि माझ्यासारखा स्वतंत्र लढवून दाखवावे.   माझी लढत ही समृद्धी महामार्ग शेतकऱ्यांच्या झालेल्या अन्याया विरुद्ध व शेतकऱ्यांच्या टाळू वरील लोणी खाणाऱ्या सोबत माझी लढत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola