Ratnagiri Sindhudurg Loksabha : रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
Ratnagiri Sindhudurg Loksabha : रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? राज्यातल्या लोकसभा निवडणुका संपल्या. आता प्रतीक्षा 4 जून रोजी येणाऱ्या निकालाची. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आणि त्या ठिकाणी येणाऱ्या निकालाची देखील सर्वांनाच उत्सुकता आहे. महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे तर महाविकास आघाडीकडून विनायक राऊत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलेले आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला. पण शिवसेनेत झालेली मोठी बंडाळी आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात कोकणी माणूस कुणाला साथ देणार? याचे उत्तर मिळणार आहे. अनेक अर्थांनी इथली निवडणूक महत्त्वाची आहे. दरम्यान रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात स्थानिक पातळीवरची गणित काय आहेत? कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतील? कुणाचं पारडं जड? याबाबत इथल्या पत्रकारांशी बातचीत केली आहे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी...