Nanar Project | नाणार रिफायनरीबाबत 1 मार्चला सभा घेऊन शिवसेना भूमिका स्पष्ट करणार
नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना १ तारखेला नाणार गावात सभा घेणार आहे. या सभेत शिवसेना आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. रिफायनरीच्या समर्थनात शिवसेनेचे स्थानिक नेते एकवटल्यानं सध्या शिवसेनेवर टीका होतेय..त्यानंतर जाहीर सभेत नाणारबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट होईल.. या सभेला शिवसेनेचे खासदार आणि इतर नेते उपस्थित राहणार आहे. तर दुसरीकडं रिफायनरीला समर्थन देणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळतीय. ही बैठक राजपूरमध्ये झाल्याची माहिती आहे.