Akola Bandh | इंदोरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंद; तृप्ती देसाईंच्या वक्तव्याचा निषेध
Continues below advertisement
हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या समर्थनात आज अकोले बंद पुकारण्यात आला आहे. भूमाता ब्रीगेडच्या तृप्ती देसाई यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे. देसाई यांनी इंदोरीकरांना काळं फासण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सम-विषमच्या वादानंतर इंदोरीकरांनी दिलगिरी व्यक्त केलीय. तरीही देसाईंनी अशाप्रकारचं वक्तव्य केल्यानं अकोलेकर संतप्त झाले आहेत. इंदोरी ते अकोले मोटारसायकल रॅली, गावातून भजन दिंडी आणि निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
Continues below advertisement