Ratnagiri Refinery : रिफायनरीला राजापुरात दुसऱ्या जागीही विरोध झाल्यानंतर आता समर्थक अॅक्शन मोडमध्ये

Continues below advertisement

रत्नागिरी : कोकणात रिफायनरी अर्थात तेल शुद्धीकरणाचा काराखाना व्हावा कि नाही, याबाबतच्या घडामोडी पुन्हा एकदा वेगानं घडत आहे. राजापूर तालुक्यातील बारसू - सोलगाव या ठिकाणी प्रस्तावित एमआयडीसीच्या जागेवर रिफायनरीच्या उभारणीबाबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर लगेगच विरोधकांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या. प्रकल्प विरोधी समितीची स्थापना झाली. विरोधाचे ठराव देखील झाले. पण, समर्थकांकडून अद्याप तोडीस तोड असं उत्तर आलं नव्हतं. अखेर रिफायनरी समर्थककांकडून याबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रिफायनरीच्या विरोधकांनंतर आता समर्थक देखील अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. बुधवारी संध्याकाळी उशिरा रिफायनरी समर्थक समितीची स्थापना करण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे कट्टर शिवसैनिक समजले जाणारे आणि माजी विभागप्रमुख असलेले नाटे गावचे रहिवाशी डॉक्टर सुनिल राणे या समितीच्या अध्यक्षपदी आहेत. या समितीमध्ये 36 जण असून देवाचे गोठणे - सोलगाव - नाटे दशक्रोशी रिफायनरी समर्थक समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे आता समर्थक देखील आर या पारची लढाई लढण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसून येत आहे. बारसू - सोलगावमध्ये रिफायनरी व्हावी यासाठी सध्या हि समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात रिफायनरीच्या प्रकल्पावरून कोकणात वाचावरण तापलेलं दिसून येणार आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram