Ratnagiri Rain | रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता
Continues below advertisement
रत्नागिरी जिल्ह्यात दुपारनंतर पावसाच्या सरींचा जोर वाढला आहे. जिल्ह्यात पुढील 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, सध्या जिल्ह्यात सरींवर पाऊस बरसत आहे. सध्या सुमद्राला उधाण आलं असून समुद्र खवळल्याचं चित्र दिसून येत आहे.समुद्रा आलेल्या उधाणामुळे किनारपट्टी भागाला काही धोका नसला तरी नागरिकांना सतर्क राहण्याची गरज आहे. जिल्ह्यात 1 जून ते 20 जुलै या कालावधीत 2042 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. सध्याचं वातावरण पाहता जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement