Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु करण्यात आलाय. इटलीमध्ये मिथेनी नावाने कंपनी सुरु करण्यात आली होती. मात्र, प्रदूषणामुळे जवळपास साडेतीन लाख नागरिक यानं बाधित झाले. त्यामुळे कंपनी आणि त्याचं उत्पादन बंद करण्यात आलं. दरम्यान, भारतातील लक्ष्मी ऑरगॅनिक यांनी ही कंपनी विकत घेतली. त्यानंतर लोटे एमआयडीसीत कारखाना सुरु करण्यात आला. याबाबत कंपनीच्या अधिकृत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पीपासचे उत्पादन केले जात आहे. याला केंद्रासह राज्यातल्या प्रदूषण बोर्डाची देखील परवानगी आहे. शिवाय, घातक असलेल्या या उत्पादनाची विल्हेवाट लावण्यासाठी देखील सरकारचे नियम पाळले जात असल्याचे कंपनीने म्हटलं आहे. इटलीमध्ये जरी चूक झाली असली तरी त्या संदर्भातली कोणतीही चूक आम्ही भारतात करणार नाही असं देखील लक्ष्मी ऑरगॅनिक यांनी स्पष्ट केलंय.