Ratnagiri : लघु उद्योग बनले 'आधार', कुंभार्लीच्या ग्रामस्थांकडून विविध पदार्थांची परदेशातही निर्यात
Continues below advertisement
चिपळूण तालुक्यातील कुंभार्ली गाव, पोफळी आणि शिरगाव या तीन गावाची एकी आजपर्यंत आई महाकाली देवीच्या आशिर्वादाने कायम आहे. कोविडच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसायही ठप्प झाले. त्यामुळे आर्थिक बाबतीत मोठी काटकसर करावी लागत आहे. त्यातच घरकुटुंब चालवायचे कसे हा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला. घर बसल्या काहीच काम धंदा नाही मुलांची शिक्षण करायची कशी असे अनेक प्रश्न निर्माण झाले. या सर्वांचा विचार करुन आपल्या कुंभार्ली, पोपळी, शिरगाव या तीन गावातील महिलांना काम मिळून त्यांना रोजगार मिळावा यासाठी प्रसन्न अडविलकर यांनी कुंभार्लीमध्ये लघु उद्योग सुरू केला.
Continues below advertisement