Ratnagiri Accident : रत्नागिरीतील मासेमारी नौकेला विजयदुर्गमध्ये जलसमाधी; नौकेवरील सर्व खलाशी सुखरुप
abp majha web team
Updated at:
13 Oct 2021 12:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरत्नागिरीतील एका मासेमारी नौकेला विजयदुर्गमध्ये जलसमाधी मिळाली आहे. धुक्यामुळे अंदाज न आल्यानं ही नौका एका खडकावर आदळून फुटली. रत्नागिरीच्या मिरकरवाडा इथल्या शौकत दर्वे यांच्या मालकीची ही नौका असून मासेमारी करुन परत येत असताना ही दुर्घटना घडली आहे. प्रसंगावधान राखत खलाशांनी लहान नौकेचा आधार घेत सहकाऱ्यांना फोन करुन मदतीसाठी बोलावून घेतलं. त्यामुळे नौकेवरील सर्व 24 खलाशी सुखरुप बचावलेत. मात्र नौका मालकाचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.