आता रेशन दुकानातही करु शकता पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्ज- काय आहे योजना
देशात आता रेशन दुकानातही पासपोर्ट आणि पॅन कार्डसाठी अर्ज (Ration Shops to provide passport and pan card application facility) करण्याची सुविधा पुरवली जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या घराजवळ अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारनं (Central Government’s big decision) मोठं पाऊल उचललं आहे. देशातील सर्व रेशन दुकानं आता कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) बनवली जाणार असून अऩेक सुविधा नागरिकांना या ठिकाणी पुरवण्यात येणार आहेत.