अनंत गितेंचं पवारांवरील वक्तव्य पक्षशिस्तीत न बसणारं : Sanjay Raut

Continues below advertisement

माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गिते यांच्यावर पवारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर पक्षातून काही कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण गितेंच्या वक्तव्यावर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट निशाणा साधला आहे. अशा प्रकारची वक्तव्यं कुणी करत असेल तर आम्ही दखल घेत नाही. उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांनीच सुचवलं होतं. शरद पवार हे आम्हा सगळ्यांचे नेते आहेत. बाळासाहेब आणि पवार सुद्धा एकत्रित व्यासपीठावर यायचे हे सांगतानाच संजय राऊत यांनी गितेंचं विधान पक्षशिस्तीत बसणारं नाही असंही म्हटलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram