Ration Shop Diwali : आनंदाचा शिधा रेशन दुकानात पोहोचलाच नाही !

Continues below advertisement

रेशन दुकानात १०० रुपयात एक किलो रवा, चणाडाळ, साखर  आणि तेल देण्याची सरकारची योजना फक्त कागदावरच असल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालंय.  महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन या संस्थेला या शिधावाटपाचं 509 कोटी रुपयांचं कंत्राट देण्यात आलंय. मात्र ही संस्था स्वत: या पदार्थांचा पुरवठा कऱणार नसून त्यासाठी या संस्थेकडून पुरवठादार कंपन्यांना कंत्राट देण्यात आलंय. या शिधा वाटपाला उशीर होण्याचं आणखी एक कारण म्हणजे ज्या पिशव्यांमधून हे शिधावाटप होणारेय त्या पिशव्यांवर मंत्री महोदयांचे फोटो छापले जाणारेत. त्यामुळे या पिशव्या आणि धान्य उपलब्ध झाल्यानंतरच शिधा वाटप केलं जाणारेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram