Ratan Tata Special Report : उद्यमशील तरूणांचा आधारवड हरपला

Continues below advertisement

Ratan Tata Special Report : उद्यमशील तरूणांचा आधारवड हरपला

भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा यांचे बुधवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने देश शोकसागरात बुडाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रपती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्वसामान्य भारतीयांनीही त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं जगविख्यात असूनही नेहमीच आपल्या साधेपणाने अवघ्या भारतीयांमध्ये आदराचं स्थान निर्माण केलेल्या टाटा समूहाचे माजी अध्यक्ष उद्योगमहर्षी रतन टाटा (Ratan Tata) यांनी बुधवारी (9 ऑक्टोबर) इहलोकीचा निरोप घेतला. आपल्याच घरातील कोणीतरी गेल्याची भावना प्रत्येक भारतीयामध्ये दिसून आली. आज त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अलोट गर्दी उसळली होती ती त्याचीच प्रचिती देत होते. उद्योगपती रतन टाटा पारशी समाजातून (Parsi rituals) असल्याने अंत्यसंस्काराचा कोणता मार्ग निवडला जाणार? याबाबत चर्चा रंगली होती. मात्र, रतन टाटा यांच्या पार्थिवावर वरळीमधील स्मशानभूमीमध्ये विद्यूत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पारंपारिक दख्माऐवजी (dakhma) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram