Rashmi Shukla Maharashtra : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक

Continues below advertisement

Rashmi Shukla Maharashtra : पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी राज्यात सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) अनेक नेत्यांना तडीपारीच्या नोटिसा येऊ लागल्या आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर त्यांच्या माध्यमातून आमचे फोन आजही टॅप केले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. आता या आरोपावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाईंनी (Shambhuraj Desai) यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केलाय.  पारदर्शक निवडणूक करायची असेल तर रश्मी शुक्ला यांना हटवा, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. याला शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे. संजय राउतांकडे रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुरावे असतील तर ते त्यांनी निवडणूक आयोगाकडे द्यावेत, उगाचच एवढ्या मोठ्या अधिकार्‍यावर खोटे आरोप करू नये, अशा शब्दात संजय राऊतांना देसाई यांनी सुनावले आहे. दरम्यान टीका करत असताना त्यांचा उल्लेख चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट असाही केला आहे.  संजय राऊत हा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट- शंभूराज देसाई  संजय राऊत यांनी मनसेच्या बाबत केलेल्या विधानावर शंभूराज देसाई यांनी खोचक टीका केली आहे. देसाई यांनी संजय राऊत हा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट आहे,  अशी टीका करत आतापर्यंत काढलेली एकही चिठ्ठी खरी ठरलेली नाही. राऊत जे पण बोललेत ते आजपर्यंत कधीही खरं झालेलं नाही. राऊत हवेतली विधान करत असतात त्यामुळे या विधानानांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही, असे  मंत्री शंभूराज देसाई म्हणाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram