Nitin Desai Rashesh Shah Edelweiss Group : आमची कृती कायदेशीरच : एडलवाईस
दरम्यान, एडलवाईस फायनान्स या कंपनीनं आपली बाजू स्टॉक एक्सचेंजच्या फायलिंगमध्ये स्पष्ट केली आहे. एडलवाईसचे अधिकारी चौकशी प्रक्रियेला संपूर्ण सहकार्य करणार आहेत, या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी असं आपलंही मत आहे, असं एडलवाईसनं म्हटलं आहे. आमच्या सर्व कृती या कायदेशीर होत्या हे चौकशीतून समोर येईल, असा दावाही कंपनीनं केला आहे.