Kolhapur : चंदगडच्या होसूरजवळ सापडले दुर्मिळ दगड, आगळ्यावेगळ्या दगडांची सर्वत्र चर्चा
कोल्हापूर जिल्ह्यात कोवाड-बेळगाव मार्गावर दुर्मिळ दगडांचा खजिना सापडला आहे. चंदगड तालुक्यातील होसूरजवळ जागेच्या सपाटीकरण सुरू होते. त्यावेळी आठ ते पंधरा फूट लांब आणि गोलाकार असे शेकडो दगड सापडले आहेत. सापडलेल्या दगडावर दुसरा दगडा आपटल्यास घंटानाद सारखा वेगळा आवाज येत आहे. त्यामुळे होसूरजवळ सापडलेले दगड कुतूहलाचा विषय बनला आहे. हा खजिना पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली असून चंदगड तालुक्यात सर्वत्र या आगळ्यावेगळ्या दगडांची चर्चा सुरू आहे. पूर्वीच्या काळी आठ ते पंधरा फूट गोलाकार दगडांचा वापर हा हेमाडपंती मंदिर तयार करण्यासाठी वापरला जात होता. त्यामुळे हा सापडलेला दगडांचा खजिना विशेष असल्याने लोकांमध्ये उत्सुकता लागली आहे. या दगडांची माहिती पुरातत्व विभागाला दिलीय. त्यांनी या दगडांच्या संदर्भातील बाबी समोर आल्यानंतरच याचा उलगडा होऊ शकणार आहे.