Mumbai BDD cylinder blast : सिलेंडर स्फोटात पुरी कुटुंब उद्ध्वस्त

Continues below advertisement

 

मुंबईत वरळीमध्ये झालेल्या सिलेंडरच्या स्फोटात लहान बाळ आणि वडिलांपाठोपाठ आता आईचाही मृत्यू झालाय. त्यामुळे कुटुंबातील ५ वर्षांचा मुलगा अनाथ झालाय. बीडीडी चाळीतल्या घरात झालेल्या स्फोटात पुरी कुटुंबातील चौघेजण गंभीर जखमी झाले. त्यातच महापालिका रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्यानं छोट्या बाळाचा मृत्यू झाला. त्यातून शिवसेना  आणि भाजप यांच्यात राजकारणाला ऊत आला. पण चार महिन्यांचं बाळ दगावल्यानंतर वडिलांचा मृत्यू झाला आणि काल बाळाच्या आईनंही शेवटचा श्वास घेतला. या कुटुंबातील पाच वर्षांचा मुलगा या दुर्घटनेनंतर अनाथ झालाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola