मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे काय म्हणाले?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना उद्देशून भावी सहकारी असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा जोरात सुरु असून त्यांनी कोणता संदेश दिला याचे तर्क लावले जात आहेत. त्यावर भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.