“अखेर ती माझ्या जीवनात आलीच”, डिसले गुरुजींनी केलं ग्लोबल टीचर पुरस्काराच्या ट्रॉफीचं स्वागत
Continues below advertisement
Global Teacher : अखेर ती माझ्या जीवनात आलीच... असं ट्विट करत रणजित सिंह डिसले अर्थात सर्वांच्या लाडक्या डिसले गुरुजींनी ट्विट केलं आणि सर्वांनाच त्यांच्या जीवनातील या आनंदाच्या बातमीबाबत कुतूहल वाटलं. त्यांचं हे ट्विट पाहिल्यानंतर अनेकांनीच त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. गुरुजींनीही या शुभेच्छांचा स्वीकार केला.
ग्लोबल टीचर म्हणून पुस्कार जाहीर झाल्यानंतर या मानाच्या पुरस्काराची ट्रॉफी नेमकी कशी असेच याबाबतही उत्सुकता पाहायला मिळाली. जागतिक स्तरावर मानाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्काराची बहुप्रतिक्षित ट्रॉफी अखेर डिसले गुरुजींच्या हाती आली आणि त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement