Corona Vaccination : 18-44 वयोगटासाठी खरेदी केलेली लस 45 वर्षांवरील नागरिकांसाठी वापरणार: राजेश टोपे
मुंबई : राज्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा आहे. 45 वर्षांवरील वयोगटातील पाच लाख नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे 18 ते 44 वयोगटासाठी राज्य शासनाने खरेदी केलेले डोस 45 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
Tags :
Corona Vaccination Corona Vaccine Vaccination Health Minister Rajesh Tope Mumbai COVID Vaccine Covid Vaccnation