Ramtek Loksabha Constituency : रामटेकमध्ये मविआत रस्सीखेच; किशोर गजभियेंचा ठाकरे गट,वंचितला प्रश्न
Ramtek Loksabha Constituency : रामटेकमध्ये मविआत रस्सीखेच; किशोर गजभियेंचा ठाकरे गट,वंचितला प्रश्न रामटेक लोकसभा मतदारसंघावरून मविआ मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचा खासदार असल्यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने या मतदारसंघात उमेदवारी स्वतःकडे ठेवण्याचा निर्धार केला आहे.. तर वंचित बहुजन आघाडीने ही रामटेकवर दावा ठोकला आहे.. त्यामुळे मविआमध्ये रामटेक मतदारसंघ कोणाकडे जाईल हा संभ्रम निर्माण झाला आहे.. असे असताना माजी सनदी अधिकारी आणि मागच्या वेळेला रामटेक मधून काँग्रेस उमेदवार म्हणून पौने पाच लाख मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या किशोर गजभिये यांनी रामटेकवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीचा दावा फेटाळून लावला आहे.. रामटेक मधील परिस्थिती आता बदलली असून त्या ठिकाणी शिवसेना उबाठा पहिल्यासारखी शक्तिशाली राहिलेली नाही.. आज जिल्हा परिषदेसह बाजार समित्या तसेच पदवीधर व शिक्षक मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात असल्याने शिवसेना उबाठा गटाने रामटेक मधील दावेदारी विसरून जावी आणि रामटेक मतदारसंघ काँग्रेसकडे द्यावा अशी मागणी केली आहे... एवढंच नाही तर वंचित ची मागणी ही त्यांनी फेटाळून लावत वंचित कडे संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्त्यांचा नेटवर्क सुद्धा नाही अशी टीका केली आहे.. एवढेच नाही तर काँग्रेस पक्षाकडून रामटेक मधून उमेदवारी मागणारे माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांच्यापेक्षा माझी लोकमान्यता, योग्यता, पात्रता, अनुभव सर्व जास्त असल्याने काँग्रेस पक्षाने योग्य उमेदवाराला संधी द्यावी असं मत व्यक्त केलंय...