Ramraje Nibalkar Ajit Pawar NCP : रामराजे निंबाळकर अजित पवारांची साथ सोडुन तुतारी हाती घेणार?

Continues below advertisement

Ramraje Nibalkar Ajit Pawar NCP : रामराजे निंबाळकर अजित पवारांची साथ सोडुन तुतारी हाती घेणार? 

पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीच्या नेत्यांच्या भक्कम मोळीतील एक-एक काठी सुटी करण्याचा शरद पवारांचा खेळ अजूनही सुरुच आहे. कारण महायुतीमधील आणखी एक सामर्थ्यवान नेता शरद पवार यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्याविरोधात उघडपणे दंड थोपटणारे अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार गटात (Sharad Pawar Camp) प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. याबाबत आजच रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, रामराजे नाईक निंबाळकर यांनी शनिवारी रात्री फलटण येथील खटके वस्ती येथे कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. या मेळाव्यात रामराजे नाईक निंबाळकर कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करुन त्यांच्याच कलाने निर्णय घेतील, अशी माहिती आहे. परंतु, रामराजे नाईक निंबाळकर यांनी घड्याळाची साथ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय पक्का केल्याची माहिती आहे. रामराजे यांच्यासोबत विद्यमान आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) देखील अजित पवार यांची साथ सोडतील, असे सांगितले जात आहे. अजित पवार यांनी एका कार्यक्रमात नुकतीच फोनवरुन दीपक चव्हाण यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, त्यानंतरही दीपक चव्हाण यांनी अजित पवार यांची साथ सोडल्यास हा अजित पवार यांच्यासाठी दुहेरी धक्का ठरेल.

कालच भाजपचे इंदापूर मतदारसंघातील नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश केला होता. हर्षवर्धन पाटील यांना आपल्या गोटात आणून शरद पवार यांनी अजितदादा गटाच्या दत्ता भरणे यांच्याविरोधात तगडा उमेदवार पक्षात जोडला होता. हा भाजप आणि अजित पवार गट दोघांसाठी मोठा धक्का ठरला होता. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram