Rapid Chess स्पर्धेत 16 वर्षांच्या प्रज्ञानंदकडून Magnus Carlsen पराभूत, ग्रँडमास्टरचा सनसनाटी विजय

Continues below advertisement

भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदनं एयरथिंग्स मास्टर्स रॅपिड ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत वर्ल्ड नंबर वन मॅग्नस कार्लसनला पराभवाचा धक्का दिला. प्रज्ञानंद स्पर्धेच्या आठव्या फेरीअखेर बाराव्या स्थानावर आहे. पण आजच्या विजयानं त्यानं कार्लसनची विजयी घोडदौड रोखण्याची कमाल केली. याआधीच्या सलग तीन फेरीत कार्लसननं विजय मिळवला होता. पण आज काळ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या प्रज्ञानंदनं कार्लसनचा 39 चालींमध्ये पराभव केला. मूळच्या तामिळनाडूच्या प्रज्ञानंदनं वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी वर्ल्ड यूथ चॅम्पियनशीप जिंकली होती. तो जगातला पाचवा सर्वात युवा ग्रँडमास्टर आहे. 2018  साली वयाच्या बाराव्या वर्षीच त्यानं हा मान मिळवला होता.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram