ABP News

Ramesh Kadam : माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतील पाठिंबा, लोकसभेपुरतं दिलं समर्थन

Continues below advertisement

Ramesh Kadam : माजी आमदार रमेश कदम यांचा महायुतील पाठिंबा, लोकसभेपुरतं दिलं समर्थन. मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. जोरदार शक्तिप्रदर्शन करत रमेश कदम यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केला. चार दिवसांपूर्वी भाजप नेते संजय क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात गेल्यानंतर माजी आमदार रमेश कदम यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. रमेश कदम अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळ घोटाळ्याप्रकरणी गेले अनेक वर्ष तुरुंगात होते. मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांची जामीनावरती सुटका झाली. ((या सुटकेनंतर ते लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा झाल्या. एमआयएमकडून रमेश कदम यांना लोकसभेची ऑफर देखील देण्यात आली होती. ही चर्चा पुढे न गेल्याने रमेश कदम यांनी सोलापुरात उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र रमेश कदम कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर रमेश कदम यांनी आपली भूमिका जाहीर करत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram