Ramdas Kadam: शिवसेना नेते रामदास कदम कोणता मोठा गौप्यस्फोट करणार? ABP Majha
शिवसेना नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांना मंत्री अनिल परब यांनी मोठा धक्का दिल्यानंतर आज रामदास कदम पत्रकार परिषद घेत आहेत या पत्रकार परिषदेत कदम कुणाकुणावर आरोप करणार हे पाहावं लागेल का राजकारणातून संन्यास घेणार? याकडे लक्ष असेल रामदास कदम यांची अनिल परबांच्या विरोधात एक कथित ॲाडियो क्लिप व्हायरल झाली होती त्यानंतर रामदास कदम यांच्या विरोधात नाराजीचं वातावरण होतं रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना पक्षातील रामदास कदम समर्थक गद्दारांना बाहेरचा रस्ता दाखवत, शिवसेना पदाधिकार्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेशानंतर हा बदल झाल्याची माहिती आहे शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पालकमंत्री अनिल परब यांच्या मागे ठामपणे असल्याचं सिद्ध झालं आहे
Tags :
Mla Shiv Sena Ratnagiri Anil Parab Announced Appointments Yogesh Kadam Press Council Leader Ramdas Kadam Dhakka Sannyas Radio Clip Outside Road