Ramdas Kadam vs Ravindra Chavan : चव्हाण-कदम भिडले, फडणवीसही बोलले, महायुतीत खडजंगी! ABP Majha
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरील टिकेनंतर रत्नागिरीतील भाजपचे पदाधिकारी शिवसेना नेता रामदास कदम यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या कुठल्याही नेत्यावर यापुढे टीका सहन केली जाणार नाही असा इशारा रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी रामदास कदम यांना दिला. सत्तेत असताना रामदास कदम यांनी मुंबई-गोवा महामार्गासाठी किती वेळा प्रयत्न केले ते सांगावे असं आव्हानदेखील भाजपने दिलं आहे. त्यामुळे भाजप आणि रामदास कदम यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेल्याचं दिसून येतंय.
मुलाचा मतदारसंघ सोडून बाहेर पडा
रामदास कदम यांच्यावर टीका करताना भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे म्हणाले की, रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. सत्तेत असताना रामदास कदम यांनी मुंबई गोवा महामार्गासाठी किती वेळा प्रयत्न केले ते सांगावं.रामदास कदम यांनी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' यातून आता बाहेर पडावे. तुम्ही राज्याचे नेते आहात तर राज्यात अनेक प्रश्न आहेत. मुलाचा मतदारसंघ सोडून बाहेर पडा.