Ramdas Kadam : 'शंभूराज देसाईंना 10 पत्रं, उत्तर नाही, रामदास कदम यांचा घरचा आहेर
स्वपक्षीयांवर टीकेचे बाण सोडणाऱ्या शिवसेना नेते रामदास कदम यांनी विधानपरिषदेत गंभीर आरोप केलेत. मनसेचे वैभव खेडेकर आणि राष्ट्रवादीची मिलीभगत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय. खेडेकर यांनी समाज कल्याण निधीत २० लाखांचा अपहार आणि डिझेलचा २३ लाखांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप कदमांनी केलाय. या संदर्भात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंना दहा पत्रं लिहिली, मात्र एकालाही उत्तर मिळालं नाही अशा शब्दांत त्यांनी घरचा आहेर दिलाय.