Maharashtra Politics: 'मंत्रीपद सोडा, गट विलीन करा'; Ramdas Athawale यांच्या ऑफरवर Prakash Ambedkar यांच्या VBAचं थेट उत्तर
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) आणि वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आठवलेंनी आंबेडकरी ऐक्यासाठी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांना महायुतीत येण्याची साद घातली आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीने आठवलेंना सडेतोड उत्तर दिले असून, 'तुमच्या मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि तुमचा आठवले गट वंचित बहुजन आघाडीमध्ये विलीन करा', असे थेट आव्हान दिले आहे. यापूर्वीही आठवलेंनी युतीचा प्रस्ताव दिला होता, पण त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता. आता पुन्हा एकदा त्यांनी हा प्रस्ताव दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. रिपब्लिकन सेनेचे आनंदराव जांभेडकर यांनी मात्र आठवलेंची ही राजकीय अस्तित्वासाठीची केविलवाणी धडपड असल्याची टीका केली आहे. एकीकडे ठाकरे आणि पवार कुटुंबीयांच्या संभाव्य ऐक्याच्या चर्चा सुरू असताना, आंबेडकर बंधू एकत्र येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement