Ram Shinde : गुंड घायवळला अनिल देशमुखांच्या माध्यमातून रोहित पवारांनी पासपोर्ट दिला- राम शिंदे
Continues below advertisement
पुण्यातील गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याच्या पासपोर्ट प्रकरणावरून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यातील वाद अधिकच चिघळला आहे. 'रोहित पवारांच्या माध्यमातून अनिल देशमुखांनी त्यामध्ये मदत केलेली आहे आणि आम्हाला दोन हजार वीस सालीच हा पासपोर्ट मिळाला आहे,' असा थेट आरोप राम शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या मते, २०२० साली महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मदतीने रोहित पवारांनी घायवळला पासपोर्ट मिळवून दिला. यापूर्वी, राम शिंदे यांनीच घायवळला परदेशात पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून, यातून सत्य बाहेर येईल, असे शिंदे म्हणाले. निवडणुकीत मदत करूनही रोहित पवारांनी दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे घायवळ आणि पवारांमध्ये मतभेद निर्माण झाले, असा दावाही शिंदे यांनी केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement