MNS-ShivSena : ठाकरे बंधू, पवार एकत्र; निवडणूक आयोगाच्या भेटीने खळबळ
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड, महाविकास आघाडीचे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या शिष्टमंडळात शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि राज ठाकरे यांचा समावेश आहे. 'निवडणूक आयोगाची भेट घेणे ही केवळ औपचारिकता आहे, कारण ते काहीही करत नाहीत', असे वक्तव्य शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी केले आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ही भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीसाठी सत्ताधारी पक्षालाही निमंत्रण देण्यात आले होते, मात्र त्यांच्या सहभागाबद्दल अनिश्चितता आहे. या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांचे एकत्र येणे, हे भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांचे संकेत मानले जात आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement