Ram Satpute-Ranjeetsingh nimbalkar :राम सातपुते आणि रणजितसिंह निंबाळकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Continues below advertisement

Ram Satpute-Ranjeetsingh nimbalkar :राम सातपुते आणि रणजितसिंह निंबाळकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आज आपला अर्ज भरणार आहेत. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रोड शो करत शक्तिप्रदर्शन केलं जाईल.सोलापुरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौक इथे देवेंद्र फडणवीस यांचे आगमन होईल. तिथून सात रस्ता चौकपर्यंत रोड शो होणार आहे. त्यानंतर दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केले जातील. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजप उमेदवार राम सातपुते यांनी आई-वडिलांच्या प्रतिमेचं पूजन केलं.. तसंच  सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात जाऊनही दर्शन घेतलं

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram