Rajyapal: राज्यपालांच्या संमतीशिवाय निवडणूक घेण्यास सत्ताधारी आघाडीतच मतभेत ABP Majha

Continues below advertisement

हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्याचा सरकारचा प्रस्ताव अखेर बारगळल्यात जमा आहे. राज्यपालांच्या संमतीशिवाय निवडणूक घेतल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भीती असल्यानं आघाडी सरकारनं निवडणूक टाळल्याची चर्चा आहे. आवाजी मतदानानं अध्यक्ष निवड घटनाबाह्य असल्याचं राज्यपालांनी काल कळवल्यानंतरही निवडणूक घेण्याची तयारी सत्ताधारी आघाडीनं केली होती. सरकारनं पाठवलेल्या तिसऱ्या पत्राला राज्यपालांनी आज उत्तर दिलं. त्यात काय संदेश दिला हे कळलं नाही. मात्र राज्यपालांच्या संमतीशिवाय निवडणूक घेण्यावरून सत्ताधारी आघाडीतच मतभेद झाल्यानं या अधिवेशनात निवडणूक होणार नसल्याचं जवळजवळ निश्चित झालं. एकीकडे काँग्रेस निवडणुकीसाठी आग्रही असताना सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन पक्षांनी मात्र राज्यपालांच्या संमतीशिवाय निवडणूक घेऊ नये अशी भूमिका घेतली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram