Rajya Sabha By-Election : राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसाठी 4 ऑक्टोबरला पोटनिवडणूक

Continues below advertisement

महाराष्ट्रात राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसह राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 22 सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे तर  4 ऑक्‍टोबरला निवडणूक होणार आहे. चार ऑक्टोबर रोजीच या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. 

दरम्यान, काँग्रेस राजीव सातव यांच्या जागेवर कुणाला पाठवणार? असा सवाल उपस्थित होत आहे. काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांची मागच्या वेळी हुकलेली संधी परत मिळणार की राजीव सातव यांच्या जागी ओबीसी चेहऱ्याचाच विचार होणार अशी चर्चा सुरु आहे. राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना नुकतंच महाराष्ट्र काँग्रेस कार्यकारणी मध्ये उपाध्यक्ष म्हणून नेमलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram