CM चं पूरग्रस्तांना मदतीचं आश्वासन,Cabinet च्या निर्णयावर आंदोलनाची दिशा ठरवू: Raju Shetti

पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी आणि इतर काही मागण्यांसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी काल पदयात्रा काढत जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. राजू शेट्टी यांच्या आंदोलनाची दखल आता सरकारने घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज 3 वाजता वर्षा बंगल्यावर राजू शेट्टी यांना भेट घेतली आहे. बैठकीत पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याच आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं अशी माहिती खुद्द खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. तर Cabinet च्या निर्णयावर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असही राजू शेट्टी यांनी  स्पष्ट केल आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola