Raju Shetty Meets Ashok Chavan : राजू शेट्टी अशोक चव्हाणांमध्ये 20 मिनिटे चर्चा ABP Majha
Raju Shetty Meets Ashok Chavan : राजू शेट्टी अशोक चव्हाणांमध्ये 20 मिनिटे चर्चा ABP Majha
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि काँगेसनेते अशोक चव्हाण यांच्यात आज वीस मिनिट बंद दाराआड चर्चा झाली. आज राजू शेट्टी नांदेडला आले. सकाळी त्यांनी अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली .. या दोन्हीं नेत्यामध्ये वीस मिनिट बैठक चालली. अशोक चव्हाण यांच्या सोबात वीस वर्षापासुनचे संबंध आहेत . आज नांदेडला आलो त्यामूळे अशोक चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. भेटीत राजकिय, सामाजिक विषयावर चर्चा झाल्याचे राजू शेट्टी म्हणाले. दरम्यान राजू शेट्टी आपले मित्र असून आमच्या सरकारच्या काळात त्याच सहकार्य लाभलेल आहे. आमची वैचारिक भुमिका एकच आहे. ते आम्हाला आम्ही त्यांना सहकार्य करतो. मित्र नांदेडला आल्याने त्याच स्वागत केल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. आगामी काळात एकत्र येऊन महाराष्ट्रात काम केलं पाहिजे अशी भुमिका मी त्यांना सांगिलली असं अशोक चव्हाण म्हणाले.