Jain Boarding Land Deal: जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेचा व्यवहार रद्द करा, Raju Shetty यांचा थेट इशारा

Continues below advertisement
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या (Jain Boarding House) जागेच्या व्यवहारावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आक्रमक भूमिका घेतली असून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना लक्ष्य केले आहे. 'मी मोहन भागवतांच्यापर्यंत जाईन, भैय्या जोशी पर्यंत जाईन, अमित शहांच्यापर्यंत जाईन पण मी गप्प बसणार नाही, या विद्यार्थ्यांना न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही', असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. हा वादग्रस्त व्यवहार केवळ स्थगित करण्यावर आपण समाधानी नसून, तो पूर्णपणे रद्द झाला पाहिजे, अशी मागणी शेट्टी यांनी केली. जोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही, तोपर्यंत आपला संघर्ष सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोहोळ यांची भूमिका प्रामाणिक असल्यास त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमधील आपल्या वजनाचा वापर करून हा व्यवहार रद्द करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आव्हानही शेट्टी यांनी दिले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola