Murulidhar Mohol : जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीवरुन राजकारण,मोहोळ यांनी फेटाळले राजू शेट्टींचे आरोप
Continues below advertisement
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या वादावरून राजकारण तापले आहे. माजी खासदार राजू शेट्टी आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 'जो जो कुणी याच्यामध्ये आडवा येईल, त्याला तोडवल्याशिवाय सोडायचं नाही', असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी मोहोळांना दिला आहे. जैन समाजाने काढलेल्या मोर्चानंतर शेट्टींनी हे वक्तव्य केले. यावर मोहोळ यांनी, 'राजू शेट्टी हे नोरा कुस्तीचे पैलवान वाटतात, खरी कुस्ती करायला माझी तयारी आहे', असे म्हणत आरोप फेटाळून लावले आहेत. आपण संबंधित बांधकाम कंपनीतून ११ महिन्यांपूर्वीच बाहेर पडलो असून या व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण मोहोळ यांनी दिले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement