Morning Prime Time Superfast News : 7 AM : सुपरफास्ट बातम्या : 20 OCT 2025 : ABP Majha

Continues below advertisement
राज्यात मतदार यादीतील घोळ आणि पुण्यातील शनिवारवाड्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. बोगस मतदारांवरून विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात 1 नोव्हेंबरला मोर्चाची हाक दिली आहे, तर दुसरीकडे खासदार मेधा कुलकर्णी आणि पतितपावन संघटनेने शनिवारवाड्यात नमाज पठणानंतर आक्रमक भूमिका घेतली आहे. बदलापूरचे शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी, 'बाहेरचे मतदार मतदान करायला आले तर त्यांना चोप देऊ', असा थेट इशारा दिला आहे. प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवर केवळ नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. या राजकीय घडामोडींमध्ये, तब्बल चोवीस वर्षांनी सेनाभवनात गेलेले मनसे नेते बाळा नांदगावकर भावुक झालेले दिसले. केंद्र सरकारने राज्यासाठी अतिवृष्टीग्रस्तांना मदत म्हणून १५६६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola