Sugarcane Protest: 'मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन', Raju Shetti यांचा सरकारला इशारा
Continues below advertisement
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी ऊस दरासंदर्भात (Sugarcane Price) मोठी घोषणा केली आहे. 'चालू गळीत हंगामासाठी सर्व साखर कारखान्यांनी प्रतिटन ऊसाला 3700 रुपयांची एकरकमी एफआरपी (FRP) द्यावी', अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी केली आहे. जयसिंगपूर (Jaysingpur) येथे झालेल्या २३व्या ऊस परिषदेत (23rd Us Parishad) ते बोलत होते. गेल्या हंगामातील ज्यादाचे प्रतिटन २०० रुपये देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. सरकारने ऊस दराबाबत १५ दिवसांत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक थांबवावी आणि एकरकमी एफआरपी कायद्याची अंमलबजावणी करावी, असेही ते म्हणाले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement