Raju Shetti Protest : राजू शेट्टींसह आंदोलनकर्त्यांची नृसिंहवाडीकडे कूच, विनाअडथळा सोडण्याची शेट्टींची मागणी
राजू शेट्टींच्या आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल आहे. रात्रीपासून प्रशासनाचा राजू शेट्टींशी संवाद सुरू आहे. नृसिंहवाडी पर्यंत विनाअडथळा सोडण्याची शेट्टींची मागणी आहे. अडवण्याचा प्रयत्न केल्यास प्रत्युत्तर देणार असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. संवादाची दारे नेहमीच उघडी, मला हा प्रश्न प्रतिष्ठेचा करायचा नाही असं म्हणत राजू शेट्टींनी सरकारला पुन्हा एकदा 4 वाजेपर्यंतची वेळ दिली आहे.