Rajnath Singh यांच्याकडून Narayan Rane यांच्या तब्येतीची विचारपूस
Rajnath Singh & Narayan Rane : मुख्यमंत्र्यांबद्दल चिथावणीखोर वक्तव्य केल्यानं केंद्रीय मंत्री नारायण राणेंना नुकतीच अटक झालेली. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटकाही झाली. पण या वादात ठाकरे विरुद्ध राणे संघर्ष चांगलाच तापला. याच दरम्यान, राणेंची तब्येत काहीशी बरी नसल्याच्या चर्चाही सोशल मीडियावर रंगल्या. त्यानंतर आता सिंधुदुर्गात राणेंची जनआशीर्वाद यात्रा सुरु असताना केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राणेंच्या तब्येतीची विचारपूस केली. तेव्हा राणेंनी त्यांच्याशी फोनवरुन केलेला संवाद माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाला.