Rajkot Fort Update : राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा नव्यानं पुतळा उभारण्यात येणार #ABPmajha

Continues below advertisement

Rajkot Fort Update : राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा नव्यानं पुतळा उभारण्यात येणार #ABPmajha

सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याच्या कामाने वेग घेतला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून याठिकाणी कोसळलेल्या पुतळ्याचे अवशेष उचलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. तूर्तास कोसळलेल्या पुतळ्याचे अवशेष पुढील आदेश होईपर्यंत जतन करून ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र नव्याने ६० फूट उंच शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी कला संचालनालयाने मान्यता दिल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम सुरू होणार आहे. नव्या पुतळ्याचा प्रकल्प आयआयटी मुंबई आणि अनुभवी मूर्तिकार राम सुतार यांच्या कंपनीला देण्यात आले आहे. तसेच पुतळा मजबूत असा उभारला जावा, यासाठी तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येणार आहे. मात्र मोठ्या पोलिस बंदोबस्तात मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याचे अवशेष सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी..

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram