Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special Report
लॉटरी तिकीटशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी तक्रारीवरुन ईडीने (ED) आज विविध राज्यातील 22 ठिकाणी छापा टाकून मोठी रक्कम हस्तगत केलीय. मेघालय स्टेट लॉटरीचे (Meghalay) डायरेक्टर यांनी केलेल्या तक्रारीवरुन मेघालाय पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. त्या एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी तपास सुरू केला होता. ईडीने सँटियागो मार्टिन, आणि त्यांच्या नेतृत्वातील मेसर्स फ्यूचर गेमिंग अँड हॉटेलविरुद्ध तपासाच्या अनुषंगाने पीएमएलए 2002 अनुसार तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मेघालय आणि पंजाब राज्यातील 22 ठिकाणांवर छापा टाकण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
ईडीने त्या चार प्रिंटींग प्रेसवरही छापेमारी केली आहे, जिथे हे लॉटरी तिकीट छापण्यात येत होते. लॉटरी मार्केटमध्ये बेकायदेशीर मार्गाने दुसऱ्या व्यक्तींना ते ऑपरेट केले जाऊ देत नव्हते. तसेच, नकली लॉटरीचे तिकीटही विक्री केला जात होते. याशिवाय विजयी तिकीटदारांच्या बक्षीस योजनेतही घपळा केला जात होता. मोठ्या संख्येने रोख स्वरुपात तिकीटांची खरेदी करुन काळा पैसा पांढरा करण्याचा गोरखधंदा केला जात असल्यचंही ईडीच्या तपासातून समोर आलंय. दरम्यान, ईडीकडून करण्यात आलेली ही मोठी कारवाई असून लॉटरीच्या तिकीटांची अशाप्रकारे ब्लॅकने विक्री होत असल्याचं हे प्रकरण समोर आल्याने लॉटरी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.