Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली असून त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली आहे. अनिल देशमुख हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काटोलकडे जात असताना बेलफाट्याजवल अज्ञात व्यक्तीने हा हल्ला केला आहे. हा हल्ला भाजपच्या लोकांनीच केल्याचं अनिल देशमुखांनी म्हटल्याचं व्हिडीओतून समोर आलं आहे.  सोमवारी संध्याकाळी काटोल विधानसभा मतदारसंघामधील नरखेड येथील सांगता सभा आटोपल्यानंतर अनिल देशमुख तीनखेडा भिष्णूर मार्गाने परत येत होते. त्यावेळी काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर दगड फेकला. यात अनिल देशमुख यांच्या वाहनाची समोरची काच फुटली आणि त्याचे तुकडे आतल्या बाजूला उडाले. त्यामुळे अनिल देशमुख जखमी झाल्याचे बोलले जात आहे. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola